Display Problems? Click here for help on viewing this page properly...
 
िंदू धर्माची मूलतत्वे
 

EdA Summary of the Beliefs and Practices Of Hundreds of Millions Worldwide
Who Follow the Saivite Hindu Religion And Worship Lord Siva as Supreme God
3

EditR


egio
।।श्री।।   
n4
 

शैव - हिंदू धर्माची मूलतत्वे


१.

शैव संप्रदायी अनुयायांची अशी दृढ श्रध्दा आहे की, शिव हा असा देव आहे की ज्याचे शुध्द अमर्याद अस्तित्व, परशिवा, समय, आकार, आणि मर्यादा यांच्या पलिकडे पोहोचले आहे योगी पुरुष स्तब्धतेने, शांतपणे उद्गगारतात,"ते हे नाही ते ते नाही" होय असा अगम्य, गूढ, ईश्वर महादेव भगवान शिवा आहे ॐ.

 

२.

सर्व शैव संप्रदायींचा दृढ विश्वास आहे की, शिव हा असा देव आहे की, ज्याचे मूळ स्वरुप हा मूळ आत्मा किंवा पराशक्ती आहे, व ती शक्ती सर्व स्वरुपातील उर्जेतून, अस्तित्वातून, ज्ञानातून आणि शाश्वत सुखातून वाहणाऱ्या स्त्रोतासारखी किंवा शुध्द सद्सद्विवेक बुध्दिरूप अशी आहे. ॐ

 

३.

शैव संप्रदायींचा असा दृढ विश्वास आहे की, भगवान शिव सर्वव्यापी स्वरुपाचा, प्रेम, मूळ आत्मा, देवाधिदेव (महादेव) परमेश्वर, वेद आणि आगमांचा जनक (लेखक), सर्व अस्तित्वांचा निर्माता, संरक्षक आणि विनाशक आहे ॐ.

 

४.

सर्व शिवभक्तांची शिव-शक्ती पुत्र देवाधिदेव गणेशावर दृढ श्रध्दा आहे. कोणतेही कार्य (काम-Work) करण्यापूर्वी ते सर्वप्रथम श्रीगणेशाची विनम्रतेने प्रार्थना करतात. श्रीगणेश दयाळू, कनवाळू आहे. तो न्यायी आहे न्याय आणि निःपक्षपातीपणा सदैव त्याच्या चित्तात असतो ॐ.

 

५.

शिव-शक्ती पुत्र महादेव कार्तिकेयावर सर्व शिव भक्तांची दृढ श्रध्दा आहे. महादेव कार्तिकेयाच्या हातातील शूळ अज्ञानाचे दास्यत्व संपुष्टांत आणतो. (मानवाचे अज्ञान दूर करतो), स्वतःला ध्यान धारणेत बंदिस्त करुन ठेदणारा योगी पूज्य मुरूगनच (कार्तिकेय) आहे. त्यामुळेच आत्मसंयमी कार्तिकेयाचे मन शांत होते ॐ.

 

६.

शिव भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की, प्रत्येक आत्मा भगवान शिवाने घडविला वा निर्मिलेला आहे, आणि प्रत्येक आत्मा हुबेहुब त्याच्यासारखा आहे. त्याच्या कृपेने आणव, कर्म आणि माया दूर झाल्यावरच सर्व आत्म्यांना ही एकरुपता पूर्णपणे जाणवेल, अनुभवास येईल ॐ.

 

७.

भू-लोक जिथे आत्मे शरीररूपाने वास्तव्य करतात, अंतरलोक जिथे आत्मे सूक्ष्म शरीराने वास्तव्य करतात, आणि शिवलोक जिथे आले आत्म तेजाच्या स्वरुपात वास्तव्य करतात, अशा त्रैलोक्यावर शिव-भक्तांची श्रध्दा आहे, विशवास आहे ॐ.

 

८.

सर्व शिव भक्तांची कर्म सिध्दांतावर (कर्माच्या नियमावर) श्रध्दा आहे. प्रत्येकजण कारणीभूत असलेल्या सर्व कर्मांचे परिणाम भोगतो आणि प्रत्येक आत्मा त्याची कर्मे भोगून संपवीपर्यंत सतत जन्म घेत असतो, व कर्मभोग संपल्यावरच त्याला मोक्ष प्राप्ती होते ॐ.

 

९.

शिव-भक्तांचा असा विश्वास आहे की, जिवंत सद्गुरूच्या कृपेव्दारेच परशिवापर्यंत घेऊन जाणारी चर्या, पुण्यमार्गाने वागणे, क्रिया, पूजा अर्चा आणि यागसाधना की, ज्या ज्ञान प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहेत, या प्राप्त होतात ॐ.

 

१०. 

मूळांत पाप किंवा दुर्दैव, दुःख असं काही नाहीच. पापाला उगमच नाही, अज्ञानच वरवर दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पापचा उगम असेल किंवा असू शकेल. शैव हिंदू खरोखर दयाळू, कनवाळू असे आहेत. त्यांना माहित आहे की, मूलतः चांगलं वाईट असं काही नसतंच ! शिवाची इच्छा हेच सर्व काही आहे. या गोषटीवर शिव-भक्तांचा विश्वास आहे ॐ.

 

११.

तिन्हीलोकांनी (त्रैलोक्याने) एकत्र, एकोप्याने केलेलेकार्य म्हणजेच धर्म. त्रैलोक्यातील सर्वप्राणीमात्रांचा सुसंवाद व एकोपा देवालयातील पुजेव्दारे साधला जातो किंवा निर्माण करता येतो ॐ.

 

१२.

सर्व शिव - भक्तांचा पंचाक्षर मंत्रावर पूर्ण विश्वास आहे. "नमःशिवाय" हा अग्रेसर मंत्र असून या पंचाक्षरांचा उच्चार शैव धर्मियांनाअत्यावश्यक आहे. "नमःशिवाय" या मंत्राचे रहस्य तो योग्यवेळी आणि योग्य व्यक्तीच्या मुखाव्दारे ऐकण्यात आहे ॐ.

 


 

श्रध्दा किंवा विश्वास

भगवान शिव सर्वव्यापी प्रेम आणि उत्कृष्ट वास्तवाचा अविष्कार आहे

Anbe Sivamayam, Satyame Parasivam (Affirmation in Tamil).

itRn5
EditRe gion10EditRe gion10
Ed


itReg
T H E    P R A C T I C E S
ion7


 
 
EditR

प्रघात किंवा रिती

पंचनित्य कर्मे म्हणजे सतत पाळावयाची पांच कर्तव्ये. हे पांच पारंपारिक नियम जर योग्य तऱ्हेने तडीस नेले किंवा पाळले तर ती व्यक्ती आपल्या महान महादेवाच्या चरण कमलाजवळ पोहोचते, आणि आपल्या स्वतःचे, आपल्या धर्माचे आपण जे ऋण लागतो त्याची त्यामुळे पूर्तता होते. ते नियम खालील प्रमाणे आहेत -

१.

उपासना : देवघरातील आणि मंदिरातील पूजा
धार्मिक संस्कार, धार्मिक शिस्त, प्रार्थना म्हणणे, योगाभ्यास आणि धर्म विषयक अभ्यास या गोष्टी आपल्या लाडक्या मुलांना रोज कुटुंबातील देवघरातील देवापुढे शिकविल्या जातात. देवळातील व घरांतील भक्तीव्दारे ते निश्चित तथा सुरक्षित राहण्यास मनाला ध्यानाव्दारे शांत रहाण्यास तयार करतात.

 

२.

उत्सव : पवित्र दिवस
आपल्या लाडक्या मुलांना हिंदू सण आणि पवित्र दिवसांत कसं सहभागी व्हायचं ते मंदिरात आणि घरांत शिकविले जाते. अशा पवित्र समारंभात सहभागी होतांना परमेश्वराशी कशी जवळीक साधायची, त्याच्याशी कसं एकरुप व्हायचं ते पण शिकविले जाते. या उत्सवांत सोमवारी किंवा शुक्रवारी उपवास करुन मंदिरात देवदर्शनासाठी जाण्याचा तसेच इतर पवित्र दिवस पाळण्याचा समावेश आहे.

 

३. 

धर्म : सदाचार
धर्माव्दारे आयुष्यातील कर्तव्ये आणि सदाचार यांचे पालन करुन आयुष्य कसे जगावे हे मुलांना शिकविले जाते. प्रथम दुसऱ्याचा विचार करणे, माता-पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा (वडील माणसांचा) तसेंच साधुसंतांचा आदर करणे, ईश्वरी नियमांचे पालन विशेषतः अहिंसा पालन महत्वाचे. अहिंसा म्हणजे सर्व प्राणीमात्रांना मानसिक, भावनिक आणि शारीरिक दृष्टया न दुखावणे. या सर्व गोष्टी शिकून मुले निःस्वार्थी कसं व्हायचं ते शिकतात. अशा तऱ्हेने ते आपल्या कर्मफळापासून मुक्त होतात.

 

४. 

तीर्थयात्राः
मुलांना कमीत-कमी वर्षातुन एकदा जवळच्या किंवा दूरच्या तिर्थयात्रेसाठी तसेंच साधूसंत आणि प्रसिद्ध मंदिरांच्या दर्शनासाठी नेण्यात येते. अशा तऱ्हेने त्यांना तिर्थयात्रेचे महत्व शिकविले जाते. या प्रवासाच्या काळांत त्यांना संसारिक (ऐहिक) कामकाजापासून परावृत्त होऊन देव, देवता आणि गुरुंची दिनचर्या यावर मन केंद्रित करण्यास शिकविले जाते.

 

५. संस्कार
मुलांना अनेक धार्मिक विधी शिकवून त्यांचे पालन करावयास लावून त्यांच्या आयुष्याचा मार्ग पवित्र आणि विशेष लक्षणीय असा करण्यांत येतो. ते जन्मविधी, नामकरण, जावळ काढणे, उष्टावण, कर्णभेद (कान टोचणे), विद्यारंभ, तारूण्यांत प्रवेश, विवाह आणि मृत्यु विधी साजरे करुन पारंपारीक जीवन पध्दती सांभाळतात.



यम आणि :े
हिंदू धर्माच्या वागणूकीच

अलिखित नियम

१.

अहिंसा (Ahimsa) - विचारने, शब्दाने किंवा कृत्याने इतरांना न दुखविणे.

२.

सत्य (Truthfulness/Satya) - खोटे बोलण्यापासून आणि वचन भंगापासून परावृत्त होणे.

३.

अस्तेय (Asteya) - चोरी न करणे, हाव न धरणे, कर्ज न घेणे.

४.

ब्रम्हचर्य (Brahmacharya) - विवाहात निषठेचे महत्वपूर्ण स्थान प्राप्त करण्यासाठी तुम्ही एकटे असाल, अविवाहित असाल, त्यावेळी तीव्र वासनांवर ताबा ठेवणे.

५.

क्षमा (Kshama) - लोकांशी वागतांना असहिष्णूतेवर आणि कोणत्याही पिरस्थितीत उतावळेपणावर ताबा किंवा नियंत्रण ठेवणे.

६.

धृति (Dhriti) - भय, व्दिधा मनःस्थिती, अनिश्चितपणा आणि चंचलता यावर मात करणे.

७.

दया (Daya) - कोणत्याही प्राणीमात्रांप्रति निष्ठूरतेने, क्रौऱ्याने आणि भावना शून्यतेने न वागणे.

८.

आर्जव (Arjava) - कपट, लबाडी, प्रमाद आणि पाप यांचा त्याग करणे.

९.

मिताहार (Mitahara) - (मित-आहार) माफक भूक ठेवणे म्हणजे गैरवाजवी न खाणे, त्याचप्रमाणे मांस, मासे, कोणत्याही जातीचे पक्षी किंवा अंडी आहारात न ठेवणे.

१०.

शौच (Shauch) - शरीर, मन आणि वाणीमधील अपवित्रपणा टाळणे.



दहा प्रधान - नियम

१.

ऱ्हीं - विनम्रतेने, विनयशीलतेने वागणे आणि वाईट कृत्याबद्दल लाज वाटणे.

२.

संतोष - आयुष्यांत आनंद, शांतात, प्रसन्नता शोधण्याचा प्रयत्न करणे.

३.

दान - मोबदल्याचा किंवा फळाचा विचारही मनांत येऊ न देता उत्पन्नाचा दहावा हिस्सा सर्जनशीलतेने दान करणे.

४.

अस्तिक्य - देव, परमेशवर, गुरु आणि आत्मज्ञान प्राप्तीचा मार्गावर दृढ विश्वास, श्रध्दा ठेवणे.

५.

ईश्वर पुजा - दैनंदिन देवपूजा आणि ध्यानधारणेव्दारे भक्ती वृध्दिंगत करणे.

६.

सिध्दांत श्रवण - धार्मिक ग्रंथातील शिकवणीचा अभ्यास करणे आणि आपापल्या कुळातील ज्ञानी, अशा वडिलधाऱ्या व्यक्तिंचे ऐकणे.

७.

मति - गुरुच्या मार्गदर्शनाने अध्यात्मिक इच्छाशक्ती आणि ज्ञान विकसित करणे.

८.

व्रत - धार्मिक विधी, नवस आणि स्वतःला आत्मखुषीने लावलेल्या शिस्तीचे श्रध्देने पालन करणे.

९.

जप - रोज पवित्र मंत्र नियमितपणे म्हणणे.

१०.

तपस् - साधना तपश्चर्या, प्रायश्चित्त आणि यज्ञ-याग हे मार्ग अवलंबणे.

 

egion8 EditRegion5
 
 
EditRe

About the author

सद्गुरू सिवाय सुब्रमुनियस्वामी (१९२७-२००१)
गुरुदेवांचा जन्म कॅलिफोर्नियात झाला होता. श्रीलंकेतील महान योगी योगस्वामीजी यांनी त्यांना ११४१साली संन्यास धर्माची दिक्षा दिली. अर्वाचीन हिंदूधर्म पुनरुज्जीवनाचे शिल्पकार तसेच २५ लाख तामीळ शैवांचे सद्गुरू असाणाऱ्या गुरुदेवांनी अमेरिकेत पहिले हिंदू-चर्च (देवालय) स्थापन केले. "हिंदूइझाम् टूडे" नावाचे मासिक सुरु करुन ते नावारुपास आणले. त्यांनी पश्चिमेस असणारे व संपूर्णपणे दगडी कोरीव काम केलेले देवालय हवाई बेटावरील कुवाई येथे बांधले. सद्गुरू बोधीनाथ विलेयनस्वामी गुरुदेवांचे वारस असून कैलास परंपरा आणि शैव-सिध्दांत योग यांचे सुव्यवस्थापक आहेत. वरील सारांश हिंदूधर्म तत्वज्ञान, संस्कृति आणि सत्यशोधन यांचा ३६५ घडयांमध्ये समावलेल्या पूजनीय गुरुदेवांच्या असामान्य त्रिविध अभ्यासक्रमातून काढला आहे. जास्त माहिती करता www.gurudeva.org ही साईट इंटरनेटवर बघावी.

This translation was by Mrs. Sudha Kulkarni of Pune as her loving contribution to Marathi and Saivism.
EditReg ion4
 
 

Copyright © Siddhanta Publications. All rights reserved.